Pune : दहशतवाद्याला पकडतानाचा थरारक व्हिडीओ समोर!

१८ जुलैच्या पहाटे कोथरूड पोलिसांनी ज्या वेळेला या दहशतवाद्यांना पकडले त्या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
Published by  :
Team Lokshahi

पुणे : कोथरुडमधून पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी एका दहशतवाद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी थरारक पध्दतीने त्याला पकडले. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.

कोथरूड पोलिसांनी १८ जुलैच्या पहाटे या दहशतवाद्यांना पकडले होते. या दहशतवाद्यांची नावे मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि शाहनवाज आहेत. यातील मोहम्मद युनूस साकी याने कोंढवा भागात पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बाला रफिक शेख या पोलिस अधिकाऱ्याने साकिला पकडून ठेवले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com