Tribal organizations: पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत आदिवासींना आरक्षण नाही

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत आदिवासींना आरक्षण देण्यात आले नाही.
Published by :
Dhanshree Shintre

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत आदिवासींना आरक्षण नसल्याचा प्रकार समोर आलं आहे. सर्वात मागास समजल्या जाणाऱ्या आदिवासी जमातींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नुकतेच पवित्र पोर्टलवर जाहीर झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या 814 आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या 216 जागांमध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासींसाठी एकही जागा राखीव नसल्याचे समोर आलं आहे. हा आरक्षण संपवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या सरळसेवा भरतीमध्ये छोट्या संवर्गातील अनेक पदांमध्ये आदिवासी प्रवर्गासाठी एकही पद दिले नव्हते. त्यानंतर आता रयत शिक्षण संस्था आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदभरतीतून आदिवासींना एकही जागा दिली जात नसल्याचे उघड झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com