Sambhaji Raje on Chhava: सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याला काही मर्यादा असाव्या, संभाजीराजेंचं वक्तव्य
छत्रपती संभाजी राजांचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित करण्याच्या अगोदरचं वादात सापडलेला पाहायला मिळत आहे. छावा' चित्रपटातील नृत्यामध्ये 'छत्रपती संभाजी महाराज यांना लेझीम खेळताना दाखवले गेले आहेत. छावा चित्रपटातील हा वादग्रस्त भागावर राजकीयवर्तुळातून पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. संभाजीराजे यांनी छावा चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा असतात, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे संभाजीराजे म्हणाले की, छावा' चित्रपटातील नृत्यामध्ये लेझीम खेळताना दाखवणं हे काही चुकीचं नाही आहे, ती आपली संस्कृती आणि अनेक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा आहे ती...पण ती गाण्याच्या स्वरुपात कोणत्या सिनला कशी घेतली आहे, याची मला काही कल्पना नाही आहे..
चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी विनंती केली होती. आता देखील त्यांना विनंती आहे, त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा. छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर एक मराठी माणूस आहे त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे.. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची ही इच्छा आहे.