राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' महत्त्वाच्या घोषणा

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' महत्त्वाच्या घोषणा

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
Published by :
Dhanshree Shintre

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पामधून घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार आज आपल्या अर्थ संकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुपारी 2 वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आलं. अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मोठ्या घोषणा

1. वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत केला जाणार आहे. 7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत.

2. संजय गांधी निराधार योजनेत 1000 वरुन 1500 रुपये पेन्शन दिली जाणार.

3. सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. सोलापूर तुळजापूर धाराशिव तेथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सूरू आहे. भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झालं आहे.

4. 1 लाख महिलांसाठी 5000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार आहेत.

5. हर घर हर नल योजनेअंतर्गत 1 कोटी नळ जोडणी करणार.

6. शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा प्रस्ताव सरकाराला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषीपंप योजना राबवण्यात येणार, 8 लाख 50 हजार नवीन कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. 

7. नगरविकासासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले.

8. वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.

9. 'मेक इन इंडिया' धोरणांतर्गत 196 कोटी रुपये निवेदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या ठिकाणी मॉल करण्यात येणार आहे.

10. नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com