Uddhav Thackeray : "या गद्दारांनी 'छावा' चित्रपट जरूर पहावा" उद्धव ठाकरेंची महायुतीवर सणसणीत टीका
विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक झाले होते. अबू आझामी यांच्या निलंबनाविषयी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या देवदेवतांचा,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान कोणीही करत असेल तर त्याला सोडले जाणार नाही. निलंबन कितीही लांबले तरी फरक पडत नाही, पण असे बोलण्याची हिंमत कोणी करू नये. अर्थसंकल्पीय सत्रापुरते नाही तर सरकारने अबू आझामींचे कायमस्वरूपी निलंबन केले पाहिजे."
छावा चित्रपट गद्दारांनी पाहावा.
पुढे ठाकरे म्हणाले की, "महायुतीमध्ये संभाजी महाराज्यांबद्दल 'छावा' चित्रपट दाखवला जात आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट दाखवले पाहिजे. 'छावा' चित्रपट गद्दारांनी पाहावा. "
नीलम गोऱ्हेंवर निशाणा
पुढे ठाकरे म्हणाले की, "नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव करायला उशीर झाला. आत्तापर्यंत नीलम गोऱ्हे निलंबित व्हायला पाहिजे होत्या. निलंबाची चर्चा या अधिवेशामध्ये करावी.
अखिलेश यादव यांना सवाल
अबू आझामी यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या वक्तव्याचे अखिलेश यादवांनी समर्थन केले होतो. याच संदर्भात अबू आझामींचे अर्थसंकल्पीय अधिवेशानापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे म्हणाले की, "अबू आझमी यांना या अधिवेशनापर्यंत कायमस्वरूपी निलंबित केले पाहिजे, अखिलेश यादव यांना सत्य माहिती आहे का?" असे शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.