Bageshwar Dham Baba: कुंभमेळ्यातील मृतांना मोक्षप्राप्ती झाली, धीरेंद्र शास्त्रींचं विधान
१३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला. महाकुंभमेळ्यात दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतात. पण, २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला तर ९० जण जखमी झाले आहेत. या घटनेवर बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
काय म्हणाले बागेश्वर बाबा?
'कुंभमेळ्यातील मृतांना मोक्ष प्राप्ती झाली असल्याचं बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. कुंभमेळ्यात 30 पेक्षा जास्त भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. यावरून कुंभमेळ्यातल्या व्यवस्थेबाबत प्रश्न उठवले जात आहेत. मात्र, बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.