व्हिडिओ
Sonalee Kulkarni : पुण्याची जी अवस्था आहे, ती सांगलीची होऊ नये; सोनाली कुलकर्णी यांचं आवाहन
सांगलीमध्ये श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने पुणे-स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या घटनेवर भाष्य केले. तिने सांगलीकरांना आवाहन केले की, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची जबाबदारी युवापिढीची आहे.
सांगलीमध्ये श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या कार्यक्रमांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होती. या कार्यक्रमात सोनालीने पुणे- स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या घटनेवर भाष्य केले आहे.
कार्यक्रमांमध्ये सोनाली कुलकर्णी म्हणाली की, "मुला-मुलींना एवढीच विनंती करते की, जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीच्या आहारी जायचे असेल, तर एखादा छंद किंवा कलेच्या आहारी जा. कारण त्यात जी नशा असते, तशी नशा कुठल्याही गोष्टीमध्ये मिळणार नाही. मला पुणेकरांबद्दल आज जी भीती वाटते. तशीच काळजी सांगलीकरांविषयी वाटतं आहे. कारण महाराष्ट्रात असा प्रकार पुन्हा होऊ नये. महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. ती जपण्याची जबाबदारी ही युवापिढीची आहे." असे सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली.