Harbour Local: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला

मुंबईची लाईफलाईन रेल्वे मागच्या दीड तासापासून ठप्प पडली आहे.
Published by :
Sakshi Patil

मुंबईची लाईफलाईन रेल्वे मागच्या दीड तासापासून ठप्प पडली आहे. सीएसएमटी स्थानकाजवळ हार्बर लाइन वरील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर जाणाऱ्या एका लोकलचा डबा घसरला. ही लोकल पनवेलवरून सीएसएमटी स्थानकवर जात होती, त्याआधीच एक डब्बा रुळावरून घसरला.

लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मात्र, गेल्या दीड तासापासून सीएसएमटी स्थानकाला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्वच लोकल बंद आहे. वडाळा ते सीएसएमटी जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व लोकलची वाहतूक बंद आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com