Video : भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयाच्या रोजगार मेळाव्यात दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपली
थोडक्यात
भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयाच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन
दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपली
व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
(Video) भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयाच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदींनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांसोबत संवाद साधला. याच मेळाव्यात दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपल्याचे पाहायला मिळत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नितीन गडकरी यांच्या बाजूला असलेल्या सोप्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसलेल्या होत्या. विशेष म्हणजे मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन आता अनेक चर्चा रंगल्या आहेत.
भारतीय डाक विभागातील दोन महिला अधिकारी एकाच सोफ्यावर बसल्या आणि एकमेकांना ढकलत तिकडे जाऊन बसा असं सांगताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा खुर्चींवरून रंगलेला वाद सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
