Beed : बीडमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार

बीडमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार समोर आला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांची जीवघेणी कसरत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

बीडमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार समोर आला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांची जीवघेणी कसरत कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बीडच्या तेलगाव येथील धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव या महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या मजल्यावर कॉपी पुरवण्यासाठी काही तरुण खिडकीहून छतावर चढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र कॉपी पुरवण्यासाठी धडपड सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com