Uday Samant: अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर सामंतांची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण साहेबांनी आताच राजीनामा दिला आहे. ते पुढचं धोरण धरण्या अगोदर आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही परंतु ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असं उदय सामंत म्हणाले.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

उदय सामंत यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण साहेबांनी आताच राजीनामा दिला आहे. ते पुढचं धोरण धरण्या अगोदर आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही परंतु ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असं उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com