राष्ट्रवादी पक्षावर उज्ज्वल निकम यांची महत्वाची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली.
Published by :
Team Lokshahi

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आहे. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. तर, शरद पवार गटानेही प्रतिवाद केला आहे. यानंतर पुढची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशातच, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

उज्ज्वल निकम म्हणाले, हा पेच प्रसंग नाही तर ही राजकीय खेळी आहे. या विषयावर निर्णय घेताना निवडणूक आयोगोसमोर प्रामुख्याने २ प्रश्न उद्भवणार आहेत. पहिला म्हणजे राष्ट्रवादी गटात खरच फूट पडली आहे का? आणि दुसरा असा की जर फूट पडली असेल तर पक्ष कोणाच्या ताब्यात आहे? निर्णय घेताना निवडणूक आयोगाला पक्षाची घटना लक्षात घेऊन ऑर्गनायझेशन लिंकवर कोणाची मेजॉरीटी आहे हे पाहून निर्णय घ्यावा लागेल. निवडूण आलेले प्रतिनिधी एका गटाच्या बाजूने जास्त असल्यास पक्ष त्यांचा होत नाही, असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com