व्हिडिओ
Uran Sarpanch: गावगुंड अजूनही मोकाट, याला जबाबदार कोण? उरणच्या सरपंचाचा पोलिसांना सवाल
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावात अजूनही दहशत कायम आहे. उरण तालुक्यातील पागोटे गावातील सरपंच कुणाल पाटील यांनी गावगुंडांच्या मोकाटपणावर पोलिसांना सवाल केला आहे.
मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता उरण तालुक्यातील सरपंचाने पोलिसांना सवाल उपस्थित केला आहे. माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न उरण तालुक्यातील पागोटे गावातील सरपंचानी पोलिसांना केला आहे. गावात धूसगुस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला मात्र गुंडांना अजून ही अटक करण्यात आली नाही. गावगुंडाच्या दहशतीमुळे गाववाले घाबरले आहेत? याला जबाबदार कोण? पोलीस आता तरी दखल घेतील का? असा प्रश्न उरणच्या पागोटे गावातील सरपंच कुणाल पाटील यांनी निर्माण केला आहे.