Seat Sharing for Loksabha Elections: लोकसभेसाठी मविआ आघाडीत वंचित बहुजन आघाडीची 12 जागांची मागणी

महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या जागा वाटपात समसमान जागा हव्या असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या जागा वाटपात समसमान जागा हव्या असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 12 जागा हव्या असल्याचं वंचितनं सांगितलं आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. चार पक्षांनी समसमान म्हणजेच प्रत्येकी 12 जागा लढवाव्यात असं वंचितचं म्हणणं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले आहेत. तर काँग्रेसची राजकीय ताकद राहिलेली नाही त्यामुळे चारही पक्षांनी लोकसभेसाठी जागा वाटप करताना समसमान जागा लढवाव्यात असं वंचितचं म्हणणं आहे. वंचितच्या प्रस्तावामुळं इंडिया आघाडीसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. वंचितच्या या प्रस्तावामुळं आंबेडकरांच्या इंडिया आघाडीच्या समावेशाचा मार्ग आणखी कठीण झाल्याचं सांगण्यात येतं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com