VBA
VBATeam Lokshahi

लाखोंची जनता, तिचा एकच नेता, वंचित बहुजन आघाडीकडून मेळाव्याचा टीझर प्रदर्शित

भारतीय बौद्ध महासभाकडून अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिम्मित्त महोत्सव आयोजित
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच आज शिवसेना आणि शिंदे गटाचा मुंबईत दसरा मेळावा आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. सोबतच अनेक राजकीय मंडळींनी विविध मेळावे आयोजित केले आहे. दरम्यान, या मेळव्याआधी जोरदार टीझर वॉर होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीने देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित केलेल्या धम्म मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केला आहे.

भारतीय बौद्ध महासभा, अकोला आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव, २०२२

३८ वर्षांची भव्य परंपरा !

लाखोंची जनता, तिचा एकच नेता !!!💪🏽✊🤘

प्रमुख मार्गदर्शक - प्रकाश आंबेडकर

दि. ६ ऑक्टोबर २०२२

वेळ - मिरवणूक दुपारी १२ वा.

ठिकाण - अकोला क्रिकेट क्लब मैदान, अकोला

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com