हॅलोविन फोटोशूटमध्ये विकी कौशल कतरिनासाठी बनला दिग्दर्शक; पाहा व्हिडिओ
Admin

हॅलोविन फोटोशूटमध्ये विकी कौशल कतरिनासाठी बनला दिग्दर्शक; पाहा व्हिडिओ

कतरिना कैफ तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कतरिनासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

कतरिना कैफ तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कतरिनासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत कतरिना कैफने तिच्या लूकने सर्वांची मने जिंकली. कतरिना कैफने तिचा लेटेस्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये विकी कौशल फोटोशूटमध्ये कतरिनाला मदत करताना दिसत आहे.

हॅलोविन पार्टीसाठी कतरिना कैफचा लूक पूर्णपणे वेगळा होता. कतरिनाने तिच्या लूकने इंटरनेटचे तापमान वाढवले ​​असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पार्टीसाठी कतरिना डीसी कॉमिक्सचे पात्र हार्ले क्विनच्या लूकमध्ये दिसली. कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विकी कौशल तिला फोटोशूटसाठी सूचना देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विकी कतरिनासाठी पोज देताना दिसत आहे.कतरिना आणि विकीच्या या क्यूट व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रतिकिया येत आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com