व्हिडिओ
Prakash Surve Video : प्रकाश सुर्वेंवर खंडणीचा आरोप; ठाकरे गटाची प्रतिक्रिया
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर खंडणीचा आरोप झाला आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्यावर खंडणीचा आरोप झाला आहे. एका व्यावसायिकाकडं बारा लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. प्रकाश सुर्वेंचा जवळचा मानला जाणारा एक शाखाप्रमुख या व्यावसायिकाकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुर्वेंच्या या व्हिडिओवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर ( Vinod Ghosalkar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.