Mumbai: हवा प्रदूषण नियंत्रण नियमांना हरताळ

मुंबई शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. बांधकामाच्या ठिकाणी हिरव्या कपड्याचे आच्छादन, धूळ प्रतिबंधक यंत्र अशा अटी घालण्यात आल्या होत्या.
Published by :
Team Lokshahi

मुंबई शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. बांधकामाच्या ठिकाणी हिरव्या कपड्याचे आच्छादन, धूळ प्रतिबंधक यंत्र अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र या अटींचे बांधकामाच्या ठिकाणी पालन नाही होत नाही आहे. अनेक बांधकामाच्या ठिकाणी या अटींचे पालन न केल्यामुळे सुमारे 787 बांधकामांना आतापर्यंत कामे थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हिरव्या कापडाची किंमतही तिप्पट झाली असून धूळ प्रतिबंधक यंत्रही मिळेनासे झाले असल्याचा विकासकांचा आरोप आहे. याचा परिणाम म्हणून बांधकामे ठप्प झाल्याचा आरोप विकासकांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com