Vijay Wadettiwar On Ashok Chavan: अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांचा निर्णय धक्कादायक असून मी गेली सोळा वर्षे त्यांच्या सोबत काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी सोबत काम केले आहे. मात्र गेले काही महिने त्यांच्या मागे चौकशीचा फेरा होता अशी देखील माहिती आहे. त्याबाबत फारसे स्पष्ट झालेले नाही. अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या वार्ता माझ्या बाबतीतही जोडल्या गेल्या. मात्र मी सध्या मतदारसंघात आहे. त्यांनी कोणाशी चर्चा केली हेही कळू शकलेले नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com