Wari Sohla 2022 : Pandharpur : वारीसाठी वाद्य साहित्य दुकाने सज्ज

पंढरीनगरीत टाळ, विना, पखवाज, तबला, ढोलकी, हार्मोनियम तंतुवाद्य आदीसह इतर भजनी वाद्याची निर्मिती होते.
Published by :
shamal ghanekar

विठुराची पंढरी आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे. पंढरीनगरीत टाळ, विना, पखवाज, तबला, ढोलकी, हार्मोनियम तंतुवाद्य आदीसह इतर भजनी वाद्याची निर्मिती होते. येथील कलाकार परंपरेने करत आले आहेत. यंदा मात्र आषाढी वारी निर्बंधमुक्त होणार असल्याने पंढरीत वाद्ये बनवण्याची धावपळ सुरू झाली आहे.

मागील दोन वर्षे करोना काळात भजनी वाद्य व्यवसाय पूर्णतः बंद होता. त्यामुळे शेकडो कुटुंबे आर्थिक अडचणीत आले होते. वाद्य बनविणे जिकरीचे असले तरी कोणत्याही तमा न बाळगता कारागीर कितीही कष्ट पडले तरी सेवा म्हणून वाद्ये बनवत आहे. यंदा मात्र आषाढी वारी भजनी व्यवसायकांना वाद्य पर्वणी ठरणार आहे. टाळ, विना,पखवाज, तबला-डगा, एकतारी विना, चिपळी, ढोलकी, हार्मोनियम या पारंपरिक वाद्याला वारीत मोठी मागणी असते. प्रत्येक वाद्याच्या किंमती २ हजार रूपयांपासून २० हजार रूपयांपर्यंत आहे. सध्या पंढरीत भजनी वाद्ये बनवण्याची लगबग सुरू झाली असून वाद्यदुकाने वारीसाठी सज्ज झाली आहेत.

Wari Sohla 2022
Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांना 'आषाढी वारी 2022' मोबाईल ॲपवरुन अशी मिळेल मदत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com