संजय राऊत अब्रुनुकसानी प्रकरणात नितेश राणेंविरोधात वॉरंट जारी

संजय राऊत यांनी नितेश राणेंवर अब्रुनुकसानी दावा ठोकला आहे. याप्रकरणी नितेश राणेंना आज माझगाव कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं आहेत.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंवर अब्रुनुकसानी दावा ठोकला आहे. याप्रकरणी नितेश राणेंना आज माझगाव कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं आहेत. माझगाव कोर्टाकडून नितेश राणे यांना बेलबाँड वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे नितेश राणेंना आता कोर्टात उपस्थित राहूनच जामीन घ्यावा लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीला नितेश राणे गैरहजर होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com