Gaja Marne & Chandrakant Patil | गजा मारणे आणि चंद्रकांत पाटील भेटीवर Nana Patole काय म्हणाले?

कुख्यात गुंडा गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कुख्यात गुंडा गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार झाला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात गजा मारणेने स्वागत केलेलं आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या सरकारमध्ये गुंड यांना वाय प्लस सिक्युरिटी दिली गेली आहे. ज्या कोणी अरेस्ट आहेत त्यांना काही लोकांना दवाखान्यात भरतीकरुन ठेवलेले आहेत आणि त्याला फाईव स्टार व्यवस्था केल्या जातात आणि आज गुंड आणि माविआ प्रवृत्तीला सरकारच पोसते आहे त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे असं या राज्यात आहे. म्हणून चंद्रकांत पाटलांनी काल त्या गुंडाबरोबर ती दहीहंडी फोडली. तर ते काही नवीन नाही आहे असं नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com