National Girl Child Day 2024: 'राष्ट्रीय बालिका दिन' साजरा करण्याचा उद्देश काय?

National Girl Child Day 2024: 'राष्ट्रीय बालिका दिन' साजरा करण्याचा उद्देश काय?

भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा केला जातो. 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास यांनी या दिवसाची सुरुवात केली होती.
Published by :
Team Lokshahi

National Girl Child Day 2024: भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा केला जातो. 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास यांनी या दिवसाची सुरुवात केली होती. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि त्यांना विकासाच्या समान संधींसह समाजात सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारतात लैंगिक भेदभाव ही नवीन गोष्ट नाही, परंतु शतकानुशतके चालत आलेली आहे. राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची सुरुवात केव्हा आणि का झाली ते जाणून घेऊया.

इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, म्हणून 24 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करणे 2008 मध्ये महिला कल्याण आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केले कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला देशाची पंतप्रधान बनली होती, जे महिलांच्या सशक्तीकरण दिशेने एक पाऊल होते. एक क्रांतिकारी बदल झाला.

देशातील मुलींना भेडसावणाऱ्या सर्व असमानतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणे, मुलींच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण याविषयी जागरूकता निर्माण करणे, मुली आणि महिलांवरील या गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यासमोरील आव्हानांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे या उद्देशाने 'राष्ट्रीय बालिका दिन' साजरा केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com