Shravan Somwar : Shivamuth : काय आहे श्रावण महिन्यातील 'शिवामूठ' परंपरा?
(Shravan Somwar ) पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावण महिन्यात महादेवाची उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत व्रत करून ही विशेष उपासना केली जाते. मात्र या उपासनेदरम्यान आणखी एक परंपरा पाहायला मिळते ती म्हणजेच शिवामूठ..! ही शिवामूठ परंपरा काय आहे? त्याचं महत्व काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शंकराला समर्पित केला जातो. श्रावणी सोमवारच्या दिवशी ही शिवामूठ परंपरा पाहायला मिळते.शिवामूठ म्हणजेच धान्यांची मूठ..! श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ महादेवाच्या पिंडीला वाहिली जाते. यामध्ये तांदूळ, तिळ, मूग, जवस आणि पाचवा सोमवार असेल तर सातू या ५ धान्यांचा समावेश असतो.
ही शिवामूठ का वाहिली जाते यामागे धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही कारणे आहेत. यामागील धार्मिक कारण म्हणजेच माता पार्वतीने भगवान शंकराला मिळवण्यासाठी हे शिवामुठीचं व्रत केलं होतं.
यामागील शास्त्रीय कारण असं की श्रावण महिन्यात पावसाळा असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते.शेतीची भरभराट व्हावी आणि पिक चांगलं यावं यासाठी धान्यांची ही शिवामूठ वाहिली जाते..! थोडक्यात निसर्गाचे आभार मानण्यासाठी ही शिवामूठ अपर्ण केली जाते.