Rahul Gandhi
Rahul Gandhi Team Lokshahi

राहुल गांधींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहून केले असे काही की पाहून हसाल, पाहा VIDEO

कन्या कुमारी पासून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडी यात्रा आता राजस्थानमध्ये पोहचली आहे.
Published by :
shweta walge

कन्या कुमारी पासून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडी यात्रा आता राजस्थानमध्ये पोहचली आहे. झालावाडच्या खेल संकुल इथून सकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या या यात्रेने सकाळी साडेनऊपर्यंत सुमारे 11 किमीचा प्रवास पूर्ण केला. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी लोकांना भेटताना दिसले. पण या प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात राहुल गांधी भाजप कार्यालयासमोरून जाताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांचा दौरा पाहण्यासाठी सकाळपासूनच भाजपच्या कार्यालयात अनेकांनी गर्दी केली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधींची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा राहुल गांधींनी फ्लाइंग किस करून त्यांना बाय बाय केलं. आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओला शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत आणि लोक त्यावर कमेंट करत आहेत.  

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com