Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनचे 2100 रुपये कधी मिळणार? - रोहित पवार

अर्थसंकल्पीय अधिवेशानात लाडकी बहिण योजनेचा मुद्दा गाजत आहे. रोहित पवार यांनी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हफ्ता न मिळाल्याबद्दल महायुती सरकारवर टीका केली.
Published by :
Team Lokshahi

अर्थसंकल्पीय अधिवेशानात लाडकी बहिण योजनेचा मुद्दा सध्या गाजत आहे. फेब्रुवारी महिना उलटून गेला तरीही महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हफ्ता आला नाही. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

रोहित पवार म्हणाले की, "महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रिंट केले होते की, आम्ही 2100 रुपये नाहीतर आम्ही 2500 पर्यंत घेऊन जाणार आहोत. लाडकी बहीण योजनेत आता पैसे देऊ असे कुठेही आम्ही म्हटले नाही असे महायुतीचे नेते सध्या म्हणत आहेत. उलट हे आता ५० लाख महिलांची नावे कमी करण्यासाठी यांच्या हालचाली सुरू आहे. महायुती सरकारने महिलांना या योजनेमध्ये अधिक जोडण्याबाबत विचार केला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहीणींना २ महिन्याचे हाफते एडवांसमध्ये दिले गेले होते. "असे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गटाचे) नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com