व्हिडिओ
विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार?
विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याबाबत साशंकता आहे. अद्याप अर्ज न दाखल झाल्याने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून निर्णय बाकी आहे. विरोधकांकडे आवश्यक संख्याबळाचा अभाव आहे.
विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार? याबाबत साशंकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नसल्याची माहिती मिळत आहे. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर याबाबत विचार करणार आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. भाजपला १३२ जागांवर यश मिळवता आलं. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही जनतेचा कौल मिळाला. शिवसेना (शिंदे गट) ५७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 20, राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) 10, तर काँग्रेसला 16 इतक्या जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही एका पक्षाला २९ इतक्या जागा मिळणं गरजेचं आहे.