व्हिडिओ
Amit Thackeray : अमित ठाकरे वरळीमधून निवडणूक लढवणार का? म्हणाले...
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीमधून लढणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला एवढेच सांगेन, मी बैठकीत एवढेच बोललो की, पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार. मी लोकसभेसाठीपण बोललेलो.
पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार. साहेब जो आदेश देतील तो मी पाळणार. त्याच्यामुळे विधानसभेत जिथे गरज लागेल तिकडे मी उतरणार. वरळी हे ठरलं नाही आहे. पण साहेब जिकडे आदेश देतील तिकडे मी उतरणार.