BJP : भाजप 80 विद्यमान खासदारांची तिकिटे कापणार? केंद्रीय निवडणूक समिती बैठकीत चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विजयाची क्षमता हाच प्रमुख निकष लावून भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विजयाची क्षमता हाच प्रमुख निकष लावून भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये विद्यामान खासदारांच्या कारभाराचा आढावा घेण्यात आला असून, 80 हून अधिक विद्यामान खासदारांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.

ज्या खासदारांची कामगिरी चांगली नसेल त्यांच्या मतदारसंघांमध्ये किमान तीन नव्या चेहऱ्यांची यादी पाठवण्यास प्रदेश भाजपला सांगण्यात आले आहे. या सर्व निकषांच्या आधारे गुरुवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये मंथन झाल्याचे समजते. तीन वा त्यापेक्षा जास्त वेळा लोकसभेचे सदस्य झालेल्या खासदारांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com