व्हिडिओ
International Womens Day 2025 : स्वांतत्र्यवीर सावरकर सभागृहात महिला दिन झाला साजरा; रश्मी ठाकरे सोहळ्यास उपस्थित
दादर येथील स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात महिला दिनानिमित्त 'ममता पुरस्कार' सोहळा; रश्मी ठाकरे यांची उपस्थिती.
दादर येथील स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात खासदार अरविंद सावंत यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने माँ साहेब सौ मीनाताई ठाकरे "ममता पुरस्कार सोहळा" चे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला रश्मीताई उध्दव ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
तसेच या कार्यक्रमाला महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. मनोरंजन पर कार्यक्रमाला "स्वरजल्लोष" वाद्यवृंदानी सुरुवात करण्यात आली. तसेच 'ममता पुरस्कार' श्रीमती कविता सुरेश गोबाडे यांना प्रदान करण्यात आला आहे.