Yashomati Thakur on Anil Bonde : अनिल बोंडेंच्या 'त्या' आरोपाला यशोमती ठाकूर यांचे जोरदार प्रत्युत्तर

निल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर बोचरी टीका करत वादग्रस्त विधान केले आहे.
Published by :
Team Lokshahi

अमरावती : भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर बोचरी टीका करत वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे पुन्हा बोंडे- ठाकूर वाद पुन्हा पेटला आहे. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकुरांची पदवी मिळाली,असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून काँग्रेसचा डीएन महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे असंही बोंडे म्हणाले आहेत.

बोंडेंच्या या टीकेला यशोमती ठाकूर यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. अनिल बोंडेंचा वेडेपणा सुरू आहे.अनिल बोंडे सध्या नैराश्यमध्ये आहेत ,अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडेंवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com