व्हिडिओ
Yavatmal | आदिवासी कुटुंब मुलभुत सुविधांपासून वंचित;आदिवासी कुटुंबांना कधी मिळणार सुविधा?
यवतमाळच्या मालेगाव तालुक्यातील करणवाडीमध्ये आदिवासी समाजाचे कुटुंब 15 ते 20 वर्ष राहत आहेत. या कुटुंबांना कोणत्या ही सोई सुविधा मिळालेल्या नाही आहेत.
एकीकडे भारत स्वतंत्र झाला याचा उत्साह आपण साजरा करतो मात्र अजून ही अशी काही ठिकाणे आहेत जे स्वतंत्र जीवन आणि सोई सुविधांसह जगत नाही आहेत. अशीच एक आदिवासी समाजाची वस्ती यवतमाळमध्ये राहत आहे ज्यांच्याकडे अजून ही मुलभुत सुविधा पोहचलेल्या नाही आहेत.
यवतमाळच्या मालेगाव तालुक्यातील करणवाडीमध्ये आदिवासी समाजाचे कुटुंब 15 ते 20 वर्ष राहत आहेत. या कुटुंबांना कोणत्या ही सोई सुविधा मिळालेल्या नाही आहेत. त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, घरकुल, वीज, पाणी कोणत्याही मुलभुत सुविधा मिळालेल्या नाही. यांची जी घर आहेत त्यांना साड्यांचे कुंपण करावे लागत आहे. त्यांना सुविधा मिळणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.