Pune Crime : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाने केली तरुणीची हत्या! नेमकं प्रकरण काय?
पुण्यामध्ये एक अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पण त्याच संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्त्या झाली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील राजगुरुनगर येथील एका अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. आता तिची हत्या झाल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयात जाते म्हणून तरुणी घरातून गेली होती. त्यावेळेस ती बेपत्ता झाली. मात्र आता त्या तरुणीची हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. तरुणी एका गावातील मुलासोबत बाईकवर गेली असल्याचे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुण पीडितेला बाईकवरुन घेऊन गेला. तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिल्याचे आता उघड झाले आहे. दुचाकीवरील व्यक्तीनेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरुणीच्या हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. त्याचबरोबर पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.