Nashik Crime : नोकरीचं आमिष दाखवून तरुणीची 7 लाखांना फसवणूक

इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये नोकरीला लावून देतो, असे सांगून एका युवतीला सात लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये नोकरीला लावून देतो, असे सांगून एका युवतीला सात लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. युवतीच्या तक्रारीनुसार इंदिरा नगर पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात ५ महिन्यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच महिन्यानंतर या संस्थेला पकडण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आलय संशयित विजयकुमार मुंडावरे हा पोलिसांना पाच महिन्यांपासून चकवा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला सीताफिने ताब्यात घेतलं त्याला न्यायालयात हजर केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com