Zeeshan Siddique : झिशान सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका होत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत.

याच पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला आहे. झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली आहे. वांद्रे पूर्वमधून आता झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com