मविआत जागावाटपाचा तिढा, थोरात थेट मातोश्रीवर, नेमकी काय चर्चा?
मविआमध्ये अजूनही काही जागांवर जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यासाठीच आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी “उद्धव ठाकरेंसोबत मी चर्चा केलेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीथला यांनी माझ्यावर उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना भटेण्याची जबाबदारी सोपवली होती. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो का? हा विचार चर्चेमध्ये होता. त्या दृष्टीने काही चर्चा झाली. काही विषय असे असतात, ज्यात प्रत्यक्ष जाऊन भेटून बोलणं आवश्यक असतं. बैठकीत जे झालं ते मी चेन्नीथला आणि खरगे साहेबांना सांगणार असल्याच ते म्हणाले.
ते म्हणाले की, उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत काही बाबींवर मी चर्चा केली. खर्गे यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा करावी. काही जागा अदलाबदल करण्यात येते का यावर चर्चा करण्यात यावी अशा प्रकारे चर्चा झाली आहे.
काही कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत त्यामध्ये राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे यांचे एकत्र कार्यक्रम करायचे आहेत. त्याबाबत चर्चा झाली आहे. इतरही सभा कार्यक्रम एकमेकांमधील समन्वय अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. काही करायचं असेल ते दोघांतील संवाद आणि समन्वयाने करायचा आहे त्यामुळे व्यतिरिक्त जागांची चर्चा आम्ही केली आहे.
या गोष्टी निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चालतात मैत्रीपूर्ण हा विषय बिलकुल आम्ही करणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोर जाणार आणि एकमेकांना मदत करत जितक्या जागा निवडून आणता येतील तितक्या निवडून आणणार. आम्ही 180 पेक्षा जास्त टार्गेट ठेवला आहे. सरकार आमचा आणायचा आहे. मुंबईतील जागा वाटपावर थोडीशी चर्चा बाकी असल्याच ते म्हणाले.
दरम्यान, जयश्री थोरात यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी विचारलं. “राजकराणात भाषण करण्याचा, लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. पूर्वी उच्च पातळीला हे सर्व चालायत. पण दुर्देवाने मागच्या पाच वर्षात पातळी घसरली आहे. त्याच स्वरुप पहायला मिळतय” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.