जागावाटपासाठी मविआची 10 तास खलबतं; अमित शाहांवर गंभीर आरोप; राऊतांची घणाघाती टीका

जागावाटपासाठी मविआची 10 तास खलबतं; अमित शाहांवर गंभीर आरोप; राऊतांची घणाघाती टीका

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकचे बिगुल वाजले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आले आहे. याच संदर्भात काल मविआची 10 तास बैठक झाली.
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकचे बिगुल वाजले आहे. विधानसभेच्या जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आले आहे. याच पार्श्वभूमीवर काल मविआची 10 तास बैठक झाली.याबाबत माहिती देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर माझी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आज साडे बारा वाजता शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, असं ते म्हणाले. तसच राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे.

राऊत काय म्हणाले?

आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील आणि आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल आणि आज साडेबारा वाजता पक्षप्रमुख यांनी तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली आहे. आम्ही सगळे आता मातोश्रीवर जाऊ चर्चा करू आणि पुढच्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू. आम्हाला असं वाटतं महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे.

आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे महाराष्ट्रात संविधान बचावचा मूव्हमेंट आहे ते यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून पराभव करू शकलो. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस एकनाथ शिंदे या चौकटीचा पराभव सहज करू शकतो आणि आम्ही नक्कीच महाराष्ट्रात त्या दृष्टीने पावलं पडत आहेत. कोणी काही म्हणू द्या या राज्यात सत्ता परिवर्तन होणार हे नक्की.

काल बैठक सुरू असताना आणखी एका विषयाला महत्त्वाचा हात घातला तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकता यावा भारतीय जनता पक्ष पराभवाच्या खाईत आहे. भारतीय जनता पक्ष डूबत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनता गेली मतदार गेले त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करायला लागली.

किमान 150 मतदारसंघात भारतीय जनता पक्ष प्रत्येक विधानसभा मतदान यादीमध्ये जे पक्के मतदार आहेत. ज्याने साधारण त्यांना असं वाटतं त्यांनी महाराष्ट्र महाविकास आघाडीला लोकसभेला मतदान केलं ते 10000 नाव प्रत्येक मतदारसंघातून काढायची आणि त्या बदल्यात दहा हजार बोगस नावं टाकायची. खोटे आधार कार्ड खोटे ओळखपत्र या माध्यमातून 10000 प्रत्येक मतदार संघा मध्ये फक्त भारतीय जनता पक्ष निवडणुका लढणार आहे असे दीडशे मतदारसंघ त्याच्यामध्ये शिंदेगट आणि अजित पवार जिथे लढणार तिथे नाही.

हा घोटाळा लोकशाहीतला सर्वात मोठा घोटाळा होत आहे. हरण्याच्या भीतीने निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला अशाप्रकारे मदत करत असेल तर मला वाटतं या देशातल्या लोकशाहीची हत्या झाली. निवडणूक आयोग हा गृह मंत्रालयाच्या आखेतारीत येतो म्हणजे अमित शहा ह्या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत.

महाराष्ट्रातल्या बीजेपीचे चार प्रमुख नेते या सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचे प्रमुख आहेत त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्याला आता राज्यपाल नियुक्त आमदार केलं आहे तो या सगळ्याचा सूत्रधार आम्ही मतदारांना जागृत करून प्रसंगी रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाला चाल करून जाऊ.तुम्हाला अशा प्रकारे निवडणुका जिंकता येणार नाही तुम्ही मर्द असाल तर लोकशाही मार्गाने आमच्यासमोर उतरा आणि जिंकून दाखवा अस आव्हान राऊतांनी दिला आहे.

बावनकुळे हे या घोटाळ्याचे एक प्रमुख सूत्रधार हा घोटाळा कसा करावा आणि कसा केला जावा यासाठी त्यांनी नागपूरला एक शिबिर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घेतल्या. त्यांनी एक विशेष शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मतदार यादीतून दहा हजार नाव कसे ओढायची आणि आपली नाव कशी घालायची यासाठी प्रशिक्षण शिबीर बावनकुळे यांनी नागपुरात घेतल. हे सरकार महाराष्ट्र मधलं म्हणजे नवीन सरकार येऊ नये महाविकास आघाडीचा यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून फुढली तयारी केली.

20 तारखेला मतदान आहे 23 तारखेला निकाल 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करण्याचा एवढा कमी वेळ दिला जात नाही तुम्ही आतापर्यंत इतिहास पाहिला असेल महाविकास आघाडी निवडणुका लढते आणि जिंकणार आहे. 23 लाजर मतमोजणी आहे तर निकाल पूर्ण लागेपर्यंत 24 तारीख उजाडणार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जिंकलेल्या आमदार इकडे येतील त्यांना अजून वेळ लागेल महाराष्ट्र फार दुर्गम आहे 26 तारखेला बैठका घेणे विधिमंडळ पक्षाचे नेते निवडणे राज्यपालाकडे दावा करणे यासाठी किमान वेळ लागतो तो दिलेला नाही 26 तारखेला जर सरकार बनवू शकले नाही तर राष्ट्रपती राजवट पुढे सहा महिने लावा हे फार मोठे कारस्थान अमित शहा यांचे आहे.

कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वाभिमानी लोकांचा सरकार बनू द्यायचे नाही आणि राज्य महाराष्ट्रातल्या शत्रूंच्या हातात राव सुरत आमदाबाद आणि गोहाटी ला हे जी कांड केली तरी त्यांच्या हातात राज्य राहो यासाठी राष्ट्रपती राजवट लगेच लावायची म्हणून फक्त दोन दिवसाचा कालावधी सरकार बनवायला दिलेला आहे लोकशाहीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घाणेरडा प्रकार झाला नाही तो अमित शह करत आहे कारण ते महाराष्ट्रातल्या एक नंबरचे शत्रू आहेत आणि बाकी एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार हे त्या महाराष्ट्रातल्या दुश्मनांचे हस्तक आहेत मांडलिक आहेत, अस ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com