India
‘भारताचं नाव बदलून USA करतील’; ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचं टि्वट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा काल (शुक्रवार) निर्णय घेतला. यानंतर भाजपाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं तर विरोधी पक्षनेत्यांसह अनेकांनी याला विरोध केला आहे.
ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगने याप्रकरणात मत व्यक्त केलं आहे. विजेंदर सिंगने नाव न घेता मोदी सरकारला टोला लगावला आहे.
'भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील', असं टि्वट विजेंदर सिगंने केलं आहे. सध्या हे टि्वट फार चर्चेत आहे.