Viral Video
Viral Video

Viral Video: गरुडाचा कहर! हरणाची मान चोचीत पकडून हवेतच शिकार; व्हिडिओ पाहून नेटकरी स्तब्ध, VIDEO व्हायरल

Eagle Hunt: सोशल मीडियावर गरुडाने हवेतच हरणाची शिकार केल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

सोशल मीडियावर वन्य प्राण्यांच्या नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात, ज्यात कधी शिकारीचे भयानक दृश्य तर कधी प्राण्यांमधील स्नेहाचे क्षण दिसतात. जंगलातील आयुष्य खरंतर क्रूर आहे. जो बलवान तोच राजा, अन्यथा शिकार होण्याची शक्यता. जंगलाचा राजा सिंह असला तरी हवेचा राक्षस गरुड आहे. अलिकडेच गरुडाने हवेतच एका हरणाची शिकार केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लाखो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये गरुडाने हरणाला चोचीत पकडून हवेतून उडत घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. हरणाचे शरीर हवेत लटकलेले असून, गरुडाने पंख पसरून सहज त्याला वाहत घेतला आहे. हरीण कोणतीही हालचाल करत नसल्याने तो कदाचित मृत असावा असे दिसते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ जंगलातील शिकारी पक्ष्यांची अपार शक्ती आणि निसर्गाचे क्रूर नियम अधोरेखित करतो. हवेतून होणाऱ्या या शिकारीने प्रत्यक्षदर्शकांना थक्क करून सोडले आहे.

व्हिडिओ @QuantumAlteredX नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्सनी कमेंट्समध्ये आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले, 'आशा आहे की हा गरुड कधीही प्राथमिक शाळेत लहानशा नाश्त्यासाठी येणार नाही!' दुसऱ्याने सांगितले, 'सोनेरी गरुड डोंगरावरून शिकार करतात. ते शिंगे पकडून झपाट्याने धावतात आणि कड्यावरून फेकून मारतात. ते पर्वत त्यांच्या मालकीचे आहेत!' तर तिसऱ्याने म्हटले, 'गरुड १४० पौंड वजनाचे हरण वाहू शकतो, हे अविश्वसनीय आहे!' हा व्हिडिओ निसर्गप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com