Viral Video
KALPANA IYER RAMBA HO DANCE 45 YEARS LATER | BOLLYWOOD NOSTALGIA

Viral Video: नॉस्टॅल्जिक धमाका! रंबा होsss गाण्यावर 45 वर्षांनंतरही ओरिजिनल डान्सरचा धमाकेदार परफॉर्मन्स, VIDEO व्हायरल

Ramba Ho Dance: ६९ वर्षांच्या वयातही त्यांचा जोश, ऊर्जा आणि नृत्य कौशल्य पाहून सोशल मीडियावर व्हिडिओ जलदगतीने वायरल झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मागील वर्षी सर्वाधिक गाजलेला चित्रपट 'धुरंधर' यातील ७० च्या दशकातील 'रंबा हो' हे गाणे जगभरात ट्रेंड झाले. इंटरनेटवर असंख्य रील्स आणि व्हिडिओ बनवले गेले, पण आता या गाण्यावर ज्येष्ठ अभिनेत्री कल्पना अय्यर यांचा ६९ वर्षांच्या वयात केलेला डान्स व्हायरल होऊन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

१९७७ च्या 'अरमान' चित्रपटातील हे गाणे उषा उथुप यांनी गायले असून, कल्पना अय्यर यांनी मूळ चित्रपटातच या गाण्यावर नृत्य केले होते. 'धुरंधर' च्या रिलीजनंतर हे गाणे पुन्हा ट्रेंडमध्ये आले आणि आता त्यांच्या ४५ वर्षांनंतरच्या डान्सने नेटकऱ्यांना अवाक् केले आहे.

अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कल्पना अय्यर जांभळ्या रंगाची साडी नेसून कौटुंबिक सोहळ्यात 'रंबा हो' वर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या कमरेच्या थिरकण्यापासून ते संपूर्ण एनर्जीपर्यंत सर्वकाही इतके जीवंत आहे की, ६९ वर्षांच्या वयातही त्यांचा जोश आणि उत्साह पाहून प्रत्येकजण कौतुकाने भरला आहे.

व्हिडिओला काही क्षणांतच लाखो व्ह्यूज मिळाले असून, हजारो नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये त्यांचे अभिनंदन केले आहे. एका युजरने लिहिले, "हे अप्रतिम आहे! किती चैतन्यपूर्ण! खूप आवडले!" तर दुसऱ्याने म्हटले, "अप्रतिम मॅडम. तुम्ही आम्हा सर्वांना जे आवडते ते करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहता." आणखी एकाने सांगितले, "तिची ऊर्जा खूप आवडली. आशा आहे की आयुष्यात पुढे जाऊन मी सुद्धा तिच्यासारखीच होईन."

कल्पना अय्यर यांच्या या डान्सने वयाची मर्यादा ओलांडून उत्साह कसा टिकवावा हे सर्वांना शिकवून दिले आहे. मूळ चित्रपटातील त्यांच्या नृत्यापासून ते आजच्या व्हायरल व्हिडिओपर्यंत त्यांचा उत्साह अचल राहिला आहे. हे गाणे पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये येऊन नेटकऱ्यांना आनंद देत आहे, आणि कल्पना अय्यर यांचा हा जलवा लवकरच अधिक व्हायरल होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com