2023 संपायला दोन महिने बाकी; 'या' 11 शुभ मुहूर्तांमध्ये करू शकता लग्न

2023 संपायला दोन महिने बाकी; 'या' 11 शुभ मुहूर्तांमध्ये करू शकता लग्न

कोणत्याही विवाहात लग्नाची तारीख ठरवताना लोक विशेषतः शुभ मुहूर्त पाहतात. एखाद्या शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर लग्न केल्यास जोडप्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.
Published on

Wedding Dates 2023 : कोणत्याही विवाहात लग्नाची तारीख ठरवताना लोक विशेषतः शुभ मुहूर्त पाहतात. एखाद्या शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर लग्न केल्यास जोडप्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते. वर्षभरात, सर्वात जास्त लग्न मुहूर्त मे-जून-जुलै आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होतात. आणि फक्त हेच शुभ मानले जातात. 2023 संपायला अजून काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही लग्नासाठी शुभ तारीख शोधत असाल तर थांबा, येथे आम्ही तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबर 2023 च्या काही तारखांबद्दल सांगणार आहोत.

2023 संपायला दोन महिने बाकी; 'या' 11 शुभ मुहूर्तांमध्ये करू शकता लग्न
यंदा दिव्यांचा सण पाच नव्हे सहा दिवस चालणार; जाणून घ्या दिवाळीच्या सर्व तारखा

शेवटच्या 2 महिन्यात 'हे' आहेत शुभ मुहूर्त

2023 मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एकूण 11 शुभ मुहुर्त होत आहेत. 23 नोव्हेंबरपासून विवाह मुहुर्तांना सुरूवात होईल आणि 15 डिसेंबर रोजी समाप्त होईल. नोव्हेंबर 2023 मध्ये 3 शुभ दिवस आहेत, तर डिसेंबर 2023 मध्ये 8 शुभ दिवस आहेत. यानंतर लोकांना पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल. 30 जूनपासून चातुर्मासामुळे सर्व शुभ कार्यांवर बंदी घालण्यात आली होती.

नोव्हेंबर 2023 मध्ये लग्नाच्या तारखा

24 नोव्हेंबर 2023

27 नोव्हेंबर 2023

29 नोव्हेंबर 2023

डिसेंबर 2023 मध्ये लग्नाच्या तारखा

3 डिसेंबर 2023

4 डिसेंबर 2023

7 डिसेंबर 2023

8 डिसेंबर 2023

10 डिसेंबर 2023

13 डिसेंबर 2023

14 डिसेंबर 2023

15 डिसेंबर 2023

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com