Amir KhanTeam Lokshahi
वेब स्टोरीज
Amir Khan: मुलांसोबत घेतला आंब्याचा आनंद; पाहा फोटो
आमिर खान हा त्याच्या मुलासोबत आंबा खाण्याची मजा लुटताना दिसत आहे.
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान(Aamir khan) त्याच्या चित्रपटांसोबतच आपल्या कुटुंबासोबत (family ) क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी देखील चर्चेत असतो.
नुकतंच आमिर खानने त्याचा मुलगा आझादसोबतचे काही फोटो (photo) शेअर केले आहेत.यात आमिर हा त्याच्या लाडक्या मुलासोबत आंबा खाण्याची मजा लुटताना दिसत आहे.
त्यांच्या समोर आंब्याने भरलेले ताट पाहायला मिळत आहे.यानंतर दुसऱ्या फोटोत आमिर हा आंबा कापताना दिसत आहे. तर आणखी एका फोटोत ते दोघेही छान आंबे खाताना दिसत आहेत.
‘तुम्ही कधी तुमच्या कुटुंबासोबत असा आनंद लुटला आहे का?’, असा प्रश्न आमिर खानने या पोस्टला कॅप्शन देताना विचारला आहे.दरम्यान त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेक युजर्सने त्याच्या या प्रश्नाला उत्तरही दिले आहे.