वसई-विरारमध्ये 7 दिवसाच्या 2 हजार गणपतीचे विसर्जन

वसई-विरारमध्ये 7 दिवसाच्या 2 हजार गणपतीचे विसर्जन

Published by :
Published on

संदीप गायकवाड | वसई विरार नालासोपाऱ्यात आज 7 दिवसाच्या 2 हजार 100 गणरायाचे आज विसर्जन करण्यात आले. 44 विसर्जन स्थळावर हे विसर्जन करण्यात आले.

मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी ही स्वत; परिसरात विसर्जन स्थळावर भेटी देऊन विसर्जनाचा आढावा घेतला आहे. सर्व कोरोनाचे नियम पाळून गणेश भक्तांनी गणरायाला निरोप द्यावा असे अहवान प्रशासनाकडून करण्यात आले.

नालासोपारा परिमंडळ 02 मध्ये 230 आणि वसई परिमंडळ 03 मध्ये 1870 असे 2 हजार 100 गणरायाचे आज 44 विसर्जन स्थळावर विसर्जन करण्यात येत आहे. तसेच ज्या गणेशभक्तांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे अशा नागरिक, वाहनधारकावर दंडात्मक कारवाईचा बडगा ही पोलिसांनी उगारला आहे. विसर्जन स्थळ, नाकाबंदी मध्ये गर्दी करताना, विना मास्क फिरताना कोणी आढळले की तात्काळ कारवाई ही सुरू केली आहे. वसई विभागात 200 च्या वर नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com