Hijaab
Hijaab

Karnataka hijab controversy | हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनीबाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

Published on

कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या  प्रशासनाविरोधात निदर्शने करणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना शनिवारी निलंबित करण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने त्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले.

''आम्ही महाविद्यालयात आलो, पण प्राचार्यांनी आम्हाला निलंबित केल्याचे सांगितले. पोलिसांनीही आम्हाला महाविद्यालयात येण्यापासून रोखले. आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही'', असे निलंबित विद्यार्थिनींनी सांगितले.

राज्य सरकारचा आदेश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाद्वारे विद्यार्थिनींना वर्गात हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालण्यास मज्जाव करण्यात आला असूनही मुली हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com