PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार; शेतकऱ्यांसाठी दिलासा की नव्या अडचणींचा इशारा?

PM Kisan Yojana : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार; शेतकऱ्यांसाठी दिलासा की नव्या अडचणींचा इशारा?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यापूर्वीच सरकारने काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यापूर्वीच सरकारने काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दिलासा तर काहींना हप्ता अडकण्याची भीती आहे.

शेतकरी गेल्या काही दिवसांपासून 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. पण मागील वेळी आधार लिंक, केवायसी आणि चुकीची बँक माहिती यांसारख्या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते. यावेळी अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सरकार सज्ज झाले आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये विशेष शिबिरे भरवली जाणार आहेत. बँक अधिकारी व संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील, आधार व बँक खात्याची माहिती दुरुस्त करतील. त्यामुळे ज्यांच्या माहितीमध्ये चुका आहेत त्यांना सुधारण्याची संधी मिळेल.

2019 साली सुरू झालेल्या या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मदत दिली जाते. ही मदत तीन हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत 20 हप्त्यांमधून देशभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, पात्र शेतकऱ्यांचा हप्ता रोखला जाणार नाही. पण चुकीची माहिती दिल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे अपूर्ण राहिल्यास शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. थोडक्यात, PM किसान योजनेचा 21 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपली बँक आणि आधारविषयक माहिती वेळेवर अपडेट केल्यास त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com