Chandrashekhar Bawankule : महसूल विभागाच्या 18 निर्णयांमुळे शेतकरी आणि घरमालकांना दिलासा, जाणून घ्या...

Chandrashekhar Bawankule : महसूल विभागाच्या 18 निर्णयांमुळे शेतकरी आणि घरमालकांना दिलासा, जाणून घ्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातून 'शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा' ही संकल्पना साकार झाली. याचपार्श्वभूमीवर शंभर दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
Published by :
Prachi Nate
Published on

राज्याच्या महसूल विभागाने गेल्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण सुधारणा करून नवीन प्रशासकीय दृष्टिकोन विकसित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातून 'शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा' ही संकल्पना साकार झाली. याचपार्श्वभूमीवर शंभर दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने 18 मोठे निर्णय घेतले आहेत.

महसूल विभागाने 18 मोठे निर्णय

  1. वाळू डेपो बंद, लिलाव पद्धतीद्वारे विक्री आणि घरकुल बांधकामासाठी 10% वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  2. कागदपत्रांसाठी आता कार्यालयात जावे लागणार नसून राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करण्यात येणार.

  3. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर

  4. सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यास धोरण विशेष अभय योजना.

  5. 'जिवंत सातबारा' मोहिमेतून मयत खातेदारांच्या 5 लाख उताऱ्यांवर वारस नोंदी.

  6. एम-सँड वापर अनिवार्य

  7. शेतरस्त्यांवरील अतिक्रमण हटवणं

  8. शेत रस्त्यांवर कायदेशीर मान्यता मिळणार.

  9. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी कायद्यात सुधारणा

  10. ड्रोनद्वारे खाण तपासणी

  11. ई-मुद्रांक प्रमाणपत्र घरबसल्या मिळणार

  12. शेतकऱ्यांना व गरजू नागरिकांना गाळ, माती, मुरूम मोफत मिळणार

  13. घरकुलासाठी वाळू घरपोच

  14. विद्यार्थ्यांसाठी 500 रुपयांच्या स्टॅम्पची सक्ती रद्द.

  15. शेतीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा देणारी‘सलोखा’ योजनेला मुदतवाढ

  16. ‘माझी जमीन, माझा हक्क’ अभियानासाठी राज्य समिती

  17. 80 नविन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

  18. शहरी भागांमध्ये भू-संपत्तीच्या नकाशांची अचूकता वाढवण्यासाठी‘नक्शा’ प्रकल्पास मान्यता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com