गणेश मंडळ
shivdicha Raja | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात महिलांवर घडणाऱ्या अत्याचारांना अनुसरून देखावा
देशात वाढत चाललेल्या महिला अत्याचारावर शिवडीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चलचित्रांचा देखावा या घटनांवर साकारलेला आहे.
देशात वाढत चाललेल्या महिला अत्याचारावर शिवडीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चलचित्रांचा देखावा या घटनांवर साकारलेला आहे. माझं काय चुकलं? अशी टॅगलाईन देत हा देखावा साकारण्यात आलेला आहे. नुकताच बदलापूरमध्ये चिमुकलींवर अत्याचार झाला होता आणि या अत्याचाराची घटना या चलचित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत.
या देखाव्यातून या घटनांवर आळा कसा घालण्यात असा संदेश मंडळाकडून देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराचा चौरंग केला जायचा तसे कायदे आता पाहायला मिळत नाही आहेत तर आता घडत असलेल्या घटनांचा आढावा घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कायदा आणि शिक्षा दिली पाहिजे हाच एक संदेश या देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न या मंत्रालयाकडून केला जात आहे.