Ganeshotsav 2024: बाप्पासाठी महागडी कंठी विकत घेता? त्यापेक्षा कापसापासून घरच्याघरी बनवा सुंदर कंठी
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पासाठी लागणाऱ्या सामानाच्या खरेदीसाठी महिनाभर आधी जरी तयारी केली तरी ती कमीचं. बाप्पाच्या पुजेचं आणि डेकोरेशच सामान खुप महाग किमतीत मिळत. त्यात बाप्पासाठी सुंदर आणि आकर्षक कंठी खरेदी करायची असेल तर त्यात देखील गोंधळ उडू लागतो. बाप्पासाठी महागातली कंठी तर प्रत्येक जण विकत घेतो पण त्याव्यतिरिक्त घरच्याघरी सुद्धा तुम्ही लााडक्या बाप्पासाठी सुंदर अशी कापसापासून कंठी बनवू शकता, कशी ते जाणून घ्या...
मेडिकलमधून किंवा जवळच्या नॉवेल्टीमधून कापसाचा एक बंच विकत घ्या आणि जेवढ्या लांबची कंठी हवी आहे तेवढ्या लांबीत तो तीन भागात कापून घ्या. त्यानंतर त्याची ज्याप्रकारे आपण कापसाची वस्त्रमाळ बनवतो त्याप्रकारे एक भाग कापलेल्या कापसाच्या पट्टीची वस्त्रमाळ बनवून घ्या. वस्त्रमाळ बनवल्यावर ज्याठिकाणी आपण हळद कुंकू लावतो त्या ठिकाणी फेविकोलचे पाणी तयार करून ते लावा.
तिन्ही कापसाच्या पट्टींची वस्त्रमाळ बनवून घ्या. यानंतर आपण ज्याप्रकारे आपल्या केसांची वेणी घालतो त्याप्रमाणे तयार केलेल्या तिन्ही कापसाच्या पट्टींच्या वस्त्रमाळेची वेणी घाला वेणी घालत असताना आपसूक त्यांची छान अशी फुलांची नक्षी तयार होईल प्रत्येक फुलाच्या मधोमध एक लाल रंगाची किंवा तुम्हाला आवडेल त्या रंगाची मोठी टिकली लावा. संपूर्ण वस्त्रमाळेची वेणी घातल्यावर तुमची कंठी तयार होईल शेवटी त्याला फ्रेंडशिप बैंडची रिबीन स्टेपलर लावून जोडा आणि अशा प्रकारे लाडक्या बाप्पासाठी कापसापासून बनवलेली सुंदर कंठी तयार होईल.