Sarafa Bazar | बाप्पाला द्या आकर्षक दागिन्यांचा साज, लाडक्या बाप्पाच्या सजावटीसाठी सराफा बाजार सजला
कोल्हापूरात बाप्पाला दागिन्यांचा साज पाहायला मिळणार आहे. लाडक्या गणरायाच्या मूर्तीला सजवण्यासाठी विविध अलंकार बाजार पोठेत दाखल झाले आहेत. तर गणेश भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात बाजार पेठेत पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनासाठी काहीच दिवस उरलेले असताना बाप्पाच्या आगमनासाठी कोल्हापूरची बाजार पेठ ही सजलेली पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाच्या सजावटीसाठी सराफा बाजार सजला आहे. बाप्पासाठी खास अलंकार बनवण्यात आलेले आहेत.
सराफा बाजारात बाप्पासाठी आकर्षक आणि विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्यासाठी भविकांची गर्दी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे. बाप्पासाठी मुकुट, हार, जास्वंदी हार, कडे, कंठी, तोडे, दुर्वा, बाजूबंद, सुंठाभुषण असे पारंपारिक दागिने भाविकांकडून खरेदी केले जात आहेत. बाप्पाच्या मूर्तीची उंची आणि आकारा प्रमाणे खास दागिने तयार केले जात आहेत. याठिकाणी चांदीचे वेगवेगळे दागिने पाहायला मिळत आहेत.
दागिन्यांसोबतच बाप्पासाठी लागणाऱ्या इतर वस्तू देखील छान डिजाईनमध्ये दिसत आहेत. त्यात मोदक, आरतीचे ताट, घंटी, वाट्या तसेच लहान पाट त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणारे चांदीची भांडी त्यात पळी, ताम्हण, पंचपत्री, कोयरी, फुलपात्र असे अनेक भांडी येथे उपल्ब्ध असल्याचे पाहायला मिळत आहेत. बाप्पासाठी जास्वंदी फूल, दुर्वा हार, चांदीच्या पानांचा हार, विडा सुपारी, केवड्याचा हार, तर आजूबाजूला ठेवण्यासाठी सोन्याचे आणि चांदीचे हत्ती तसेच बाप्पाच्या कानात घालायला सोन्याची आणि चांदीची, मोती असलेली बाली भाविकांच लक्ष वेधत आहे.