गणेशोत्सव 2025
गणेश भक्तांच्या सोयीसाठी रायगड प्रशासन सज्ज; मुंबई गोवा महामार्गावर 10 ठिकाणी सुविधा केंद्र
गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आला आहे.
भारत गोरेगावकर, रायगड
गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आला आहे. अनेक गणेशभक्त कोकणात येत असतात. याच पार्श्वभूमीवर गणेश भक्तांच्या सोयीसाठी रायगड प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावर 10 ठिकाणी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत.
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. चाकरमान्यांना सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा मिळणार आहे.
या मदत केंद्रांवर पोलीस मदत केंद्र, टोईंग व्हॅन, वाहन दुरूस्ती, वैद्यकीय सुविधा, बालक आहार कक्ष, महिलांसाठी फिडींग कक्ष आदी सुविधा असतील. तर प्रवाशांना चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस आदी मोफत पुरवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)